Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedचाळीसगावातील डॉक्टर नाशिक येथे पॉझिटिव्ह

चाळीसगावातील डॉक्टर नाशिक येथे पॉझिटिव्ह

चाळीसगाव – 

शहरातील जहागीरदार वाडी येथील एका आयुवैदिक डॉक्टरचे नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह मिळुन आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील डॉक्टरांना अस्वस्थ वाटत असल्याने, ते उपचारासाठी नाशिक येथे गेले होते.त्याठिकाणी त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

यासंबंधीची माहिती मिळताच प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर ,तहसीलदार अमोले मोरे, वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या घराचा परिसराची पाहणी केली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारंटाईन केले. त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती मिळताच नगरसेवक सुर्यकांत ठाकुर, नगरसेवीका सविता राजपूत, जेष्ठ पत्रकार सुनील राजपूत, गणेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच न.पा.च्या कर्मचार्‍यांना सूचना देवून तात्काळ संपूर्ण परिसराची जंतुनाशक फरवारणी स्वच्छता केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या