ट्रकच्या धडकेत सुप्रीम कॉलनीतील तरुण ठार
स्थानिक बातम्या

ट्रकच्या धडकेत सुप्रीम कॉलनीतील तरुण ठार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

एमआयडीसीमधील काम करुन घरी परत जाणार्‍या मोटारसायकल स्वाराला मंगळवारी सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद राज्यमार्गावरील सुप्रीम कॉलनीजवळील टिपू सुलतान रिक्षा थांब्याजवळ भरधाव ट्रकने धडक दिली. यात मोटारसायकलस्वार दौलत उत्तम शेरे (वय ४०, रा.सुप्रीम कॉलनी) जागीच ठार झाले.

दौलत उत्तम शेरे हे एमआयडीसी परिसरात हमाली काम करीत होते. ते एमआयडीसीमधील काम आटोपूून मंगळवारी सायंकाळी मोटारसायकल (क्र.एमएच २१ एफ १६७६) घरी जात होते. जळगाव-औरंगाबाद रोडवरुन सुप्रीम कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्याने घरी जात असताना टिपू सुलतान रिक्षा थांब्याजवळ सुप्रीम कॉलनीकडून राज्यमार्गाकडे जाणार्‍या मालट्रक (क्र.एमएच ०४ एफडी २०१३) ने मोटारसायकलला धडक दिली. यात दौलत शेरे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. तर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com