शिष्यवृत्तीच्या उर्दू पेपरमध्ये झालेल्या चुकांची चौकशी करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ‘देशदूत’ ला माहिती
स्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीच्या उर्दू पेपरमध्ये झालेल्या चुकांची चौकशी करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ‘देशदूत’ ला माहिती

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । फारुक पठाण

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्याची गंभीर बाब माझ्यापर्यंत आलीच नाही, या प्रकाराची चौकशी करुन माहिती घेते, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

शिक्षण परिषदेतर्फे रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यात इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या उर्दू माध्यमाच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका हात्या. अनेक ठिकाणी उत्तर देण्यासाठी मिळणारे पर्यायच देण्यात आले नाही. उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने शासनाच्या शिष्यवृत्तीची गरज असते. यासाठी विद्यार्थी व शिक्षक मोठे परिशम घेतात.

पेपरमध्ये चुका असल्याने विद्यार्थ्यांना पेपर लिहता आला नाही. शासनाने याची त्वरीत दखल घेऊन नव्याने पेपर घेण्याची मागणी होत आहे. प्रथम भाषा आणि गणितचा पेपर असतांना प्रथम पानावर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता असा उल्लेख होता, तर उर्दू भाषेच्या ठिकाणी मीडियम इंग्रजी असे लिहून आले होते.

Deshdoot
www.deshdoot.com