नाशिकच्या देवळाली फायरिंग रेंजमध्ये तोपची 2020 चा थरार
स्थानिक बातम्या

नाशिकच्या देवळाली फायरिंग रेंजमध्ये तोपची 2020 चा थरार

Gokul Pawar

Gokul Pawar

नविन नाशिक l प्रतिनिधी
चाल करून येणाऱ्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी नाशिकच्या देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टीलरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तोपची कार्यक्रमात तोफांचा थरार बघावयास मिळाला.

यादरम्यान, शत्रूचा अचूक वेध घेत या तोफांनी उपस्थितांनी मने जिंकली. यावेळी लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक टाकतीचे दर्शन घडले.

अत्याधुनिक अल्ट्रा लाईट होवितजर एम-777, स्वयंचलित के 9 वज्र यासोबतच लढाऊ हेलिकॉप्टर चेतक आणि चिता यांनीही उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी लेफ्टनंट जनरल दिपीनदर सिंह आहुजा, अति विशेष सेवा मेडल, चीफ ऑफ स्टाफ, दक्षिण कमांड आणि लेफ्ट जनरल आर एस सलारीया यांच्यासह लष्कराचे अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

Deshdoot
www.deshdoot.com