Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रभरती प्रक्रियेसाठी महापोर्टलची क्षमता वाढविणार – ठाकरे

भरती प्रक्रियेसाठी महापोर्टलची क्षमता वाढविणार – ठाकरे

नागपूर | वृत्तसंस्था

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यास महापोर्टलची क्षमता कमी पडणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे महापोर्टलची क्षमता वाढेपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच महापोर्टलसंदर्भात परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, किरण पावसकर, हेमंत टकले, सतेज ऊर्फ बंटी पाटील आदी सदस्यांनी ही लक्षवेधी मांडली होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाआयटी’च्या माध्यमातून महापोर्टलद्वारे राज्य शासनाच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते.

यासाठी विषयतज्ज्ञ प्रश्नपत्रिका तयार करीत असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील वेगवेगळ्या 67 केंद्रांवर घेतली जाते. या प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारींवरून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून आणखी एकदा चौकशी सुरू आहे.

तसेच महापरीक्षा पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. या परीक्षणाच्या अहवालाच्या  आधारे महा ई परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील. परीक्षार्थींवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी राज्य शासन सतर्क आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या