‘इम्पॉरमेंट ऑफ नाशिक’ कडून कराेना योद्धांसाठी 12 हजार नग मास्क

नाशिक | प्रतिनिधी
कराेनाला हरविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. मास्कचा अपरा पुरवठा हाेत असल्याची बाब लक्षात घेऊन शहरातील ‘इम्पॉरमेंट ऑफ नाशिक’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी १२ हजार नग कापडी मास्क बनवून जिल्हा प्रशासन व शहर पाेलीसांना कर्तव्य म्हणूण देऊ केले आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुके, गावखेड्यातले प्रशासकीय कर्मचारी वर्ग, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्ती व अधिकारी या सारख्या अनेक स्तरातील हजारो व्यक्तीपर्यंत अनेक वेळा धूऊन वापरता येतील असे कापडी मास्क सद्य परिस्थितीत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सध्या कराेना व्हायरसचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. नाशिक जिल्ह्यात ही त्याची प्रचिती येत आहे.
करोना संसर्ग कमी होण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने सर्वांनी मास्क वापरणे सक्तीचे करावे असे निर्देशही सर्वसामान्य जनतेस व  प्रशासनास दिले आहे. मात्र सर्वत्र मास्कचा तुटवडा बाजारामध्ये बघायला मिळतो आहे. हीच अत्यंत महत्वाची सध्याची सामाजिक गरज ओळखून त्या साठी ‘इम्पॉरमेंट ऑफ नाशिक’ या सेवाभावी संस्थेतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निधी उभारला व अनेकवेळा धुवून वापरता येतील अश्या प्रकारचे बारा हजार कापडी मास्क तयार करण्यात आले आहे.
त्या सर्वांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण ही करण्यात आले आहे. दि. 16 एप्रिल रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मास्क  प्रदानाचा दुसरा टप्पाही सोशल डिस्टस्टिंग पाळून पूर्ण करण्यात आला. जिल्हाधिकारी. सुरज मांढरे यांना पाच हजार कापडी मास्क गरजू प्रशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसाठी    देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले. याचप्रमाणे मास्क वाटपाचा पहिला टप्पा हा शहर पोलीस दलास प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी खास अभिनंदन पत्र चित्रकार राजेश सावंत यांच्या सह उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करून सर्वांचा विशेष गौरव करण्यात आला. सध्या हजारो पोलीस कर्मचारी या मास्कचा वापर करून सुरक्षित ड्युटी करीत आहेत. या कर्तव्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आता तिसऱ्या टप्प्यात नाशिकमधील  विविध भागातील बेघर व्यक्तींपर्यंत पोहचून उर्वरित दोन हजार कापडी मास्क प्रदान करण्यात येणार आहेत. सामाजिक संस्थेचे संगीता चव्हाण, अंजली पावगी, सुरेखा कमोद, जयश्री पेंढारकर, मंदाकिनी पाटील यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या खास प्रयत्नांतून हे मास्क तयार करण्यात आले आहेत.