‘मेघदूत’ साधणार शेतकऱ्यांशी संवाद; आयएमडी व आयसीएआरकडून अ‍ॅप विकसित

‘मेघदूत’ साधणार शेतकऱ्यांशी संवाद; आयएमडी व आयसीएआरकडून अ‍ॅप विकसित

नाशिक | प्रशांत निकाळे 

गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अचानक होणारे बदल दिसून आले आहेत. या बदलांमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्षे, तांदूळ, डाळिंब यासारख्या जिल्ह्यातील प्रमुख पिकांना गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) हवामानातील अशा बदलांविषयी शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी ‘मेघदूत’ हे स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.

जिल्ह्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना वेळेवर हवामानविषयक सूचना देण्यासाठी ‘मेघदूत’ हे स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.

या अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने शेतकरी तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा आणि पाऊस यासंबंधी माहिती मिळवू शकतात. या मधील माहितीच्या आधारे पुढील पाच दिवस पिकाचे नियोजन करता येऊ शकते. अ‍ॅप वापरणार्याला हवामान खात्याने दिलेल्या वातावरणाचा अंदाज याची हि माहिती मिळू शकते. अ‍ॅपवर त्यांच्या मोबाईल नंबरसह नोंदणी करून कोणीही या विषयाची माहिती मिळवू शकतो.

या स्मार्टफोन अ‍ॅपला ग्रामीण कृषी मौसम सेवा (जीकेएमएस) केंद्राकडून माहिती पुरवली जाईल. नाशिक जिल्ह्यासाठी इगतपुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागीय संशोधन केंद्राकडून हे आदान प्रदान केले जाईल.

झोनल स्टेशन इगतपुरी हे इगतपुरी या ठिकाणी कृषी सेवा केंद्र वेधशाळा हाताळते आणि हवामान खात्याचा कृषी सल्ला पुरवतो. नाशिक जिल्ह्यातील सर्व हवामानविषयक माहिती या जीकेएमएस केंद्राद्वारे गोळा केली जाईल आणि दररोज फीडसाठी अपला प्रदान केली जाईल.

या स्मार्टफोन अॅप्लिकेशनचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा अशी विनंती केंद्रातील अधिकाऱ्यांनी केली आहे. हा अ‍ॅप अँड्रॉइड तसेच iOS वापरकर्त्यांद्वारे त्यांच्या अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड करू शकतो.

मिळणार पिकनिहाय सल्ला

प्रत्येक शेतकर्‍यासाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये एक वेगळी माहिती मिळेल. पूर्वीच्या मेसेज आणि इमेलमध्ये काही मोजक्या पिकासाठी कृषी सल्ला दिला जात होता , जो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नव्हता. आता ‘मेघदूत’मुळे प्रत्येक पिकासाठी वेगळा कृषीसल्ला दिला जाईल. शेतकरी आपल्या पिकानुसार कृषीसल्ला निवडू शकतात. अ‍ॅप्लिकेशन निवडलेल्या स्थानानुसार किंवा तुमच्या मोबाईलच्या लोकेशन नुसार पिके दर्शवितो. जसे नाशिकसाठी  यात गहू, भुईमूग, कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांची माहिती मिळते.

हे स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन शेतकर्‍यांना लवकरात लवकर सूचना देईल आणि हवामान स्थितीबाबत मार्गदर्शन करेल. हवामानाची माहिती वेळेत मिळाल्याने शेतकऱ्याला हवामानाच्या परिस्थितीशी सामना करण्यास मदत मिळू शकते, जे या अ‍ॅप्लिकेशनचे मुख्य काम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्‍याने आपले पीक व्यवस्थापित करण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करावा.

डॉ. दत्तात्रय कुसाळकर, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, नोडल अधिकारी

प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी हवामान खात्याने प्रकाशित केलेल्या हवामान बुलेटिन ची माहितीहि या अ‍ॅप्लिकेशन मिळेल. हवामान खात्याचा कृषी सल्ला पाठवण्यासाठी मोबाईल मेसेज आणि ईमेलला मर्यादा येतात. मोबईल मेसेजच्या . स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन प्रयोगासह आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. पाच दिवसांचा अंदाज त्यांना पाणी देण्याची आणि पिकांची कापणी यासारख्या पिकांची योजना करण्यास मदत करेल

जी एन फुलपागारे, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, नोडल अधिकारी

अ‍ॅपच्या 11 भाषा

हे अ‍ॅप्लिकेशन 11 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे मराठी भाषेतही माहिती देण्यात येणार आहे. अ‍ॅप्लिकेशन लॉग इन करण्यापूर्वी वापरकर्त्यास त्याची पसंतीची भाषा निवडावी लागेल. मराठी भाषेसह हे अ‍ॅप्लिकेशन पंजाबी, हिंदी, इंग्रजी, उडिया, गुजराती आणि इतर पाच भाषांमध्येही उपलब्ध आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com