हैद्राबाद पोलिसांची नजर चुकवून एकाची शासकीय विश्रामगृहावरून आत्महत्या
स्थानिक बातम्या

हैद्राबाद पोलिसांची नजर चुकवून एकाची शासकीय विश्रामगृहावरून आत्महत्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

शासकीय विश्राम गृहावरून एकाने उडी मारत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. उडी मारणारी व्यक्ती सराफ व्ययवसायिक असून विजय बिरारी असे या व्यक्तीचे नाव आहे. बिरारी यांचे पेठ रोडवर दुकान असल्याचे समजते.

हैद्राबादमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरफोड्या झाल्या होत्या. या प्रकरणात हैद्राबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून घरफोडीतील सोने नाशिक येथील सराफ व्यावसायिक बिरारी याच्याकडे विक्री केल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार हैद्राबाद पोलिसांनी नाशिकमध्ये दाखल होऊन बिरारी यास ताब्यात घेतले होते. रात्री उशीर झाल्यामुळे पोलिसांनी शहरातील शासकीय विश्राम गृहात काल मुक्काम केला.

आज सकाळी हैद्राबाद पोलिसांची नजर चुकवून शासकीय विश्राम गृहाच्या चौथ्या मजल्यावरून बिरारी नामक सराफ व्यावसायिकाने आत्महत्या केली.

आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.  घटनेची माहिती तात्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यास देण्यात आली.

यानंतर मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.  दरम्यान, बिरारी भाजपचा पदाधिकारी असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com