शहादा येथील अपघातात पती पत्नी ठार

शहादा येथील अपघातात पती पत्नी ठार

गुजरात राज्यातील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ आज सकाळी कार आणि डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांचीदोन्ही मुले अपघातात सुदैवाने वाचली आहेत. मयत पती-पत्नी तालुक्यातील अनरद गावातील रहिवासी आहेत.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि.5 रोजी शहादा तालुक्यातील अनरद येथील राजपूत परिवार गुजरात राज्यातील वापी येथून गावी येत असताना सकाळी आठ वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ कार आणि डंपरमध्ये जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला.

डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने कार डंपरखाली दबूली गेल्याने कार चालवत असलेले पती आणि त्यांच्या बाजुला बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली मुले बचावलीअसून त्यांना गंभीर इजा पोहोचली आहे. अपघात होताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उच्छल सरकारी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यासाठी दाखल केले.

राजपूत परिवार सकाळी 6.45 ला कार क्रमांक (एम.एच 39 जे 1412) ने गुजरात राज्यातील वापीहून शहादा तालुक्यातील अनरद येथे येत असतांना सकाळी 8 वाजेच्या सुमारास नवापूर जवळील उच्छल-निझर रस्त्यावरील गवाण गावाजवळ रेतीने भरलेल्या डंम्पर क्रमांक (जी.जे 21 व्ही 4425) ने जोरदार धडक दिली. त्यामुळे कार डंपरखाली येवून डंपर

ने दुरपर्यंत घसरत नेले. या अपघातात पुढील सीटवर बसलेले चालक योगेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पत्नी गायत्री

योगेंद्र राजपूत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मागे बसलेली त्यांची मुले निलमकुमार राजपूत, मयंककुमार राजपूत सुदैवाने अपघातात बचावले आहेत. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर उच्छल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतक राजपूत दांपत्य व बालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अपघात इतकाभयंकर होता की मृत्यू झालेल्या राजपूत दांपत्याला बाहेर काढणे अवघड झाले होते. दोन्ही जखमी बालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. कारचे दरवाजे काच फोडून मुलांना बाहेर काढण्यात आले. अपघात मृत्यूमुखी झालेले योगेंद्र राजपूत गुजरात राज्यातील वापी येथे सहाय्यक अभियंता म्हणून खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा खिशातील ओळखपत्रावरुन त्यांचा संपर्क क्रमांक मिळाला.

माझे आईबाबा कुठे गेले?

एवढ्या मोठ्या अपघातात चिमुकला निलमकुमार राजपूत याला कुठल्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. अपघात झाला त्यावेळी निलमकुमार हंबरडा फोडून रडत होता. माझे आईबाबा कुठे आहेत? माझ्या आई बाबांकडे मला घेऊन जा, असे सांगत रडत होता. दोघे बालक बचावले असले तरी त्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com