‘देशदूत’च्या आरोग्य शिबिरास लासलगावी उदंड प्रतिसाद
स्थानिक बातम्या

‘देशदूत’च्या आरोग्य शिबिरास लासलगावी उदंड प्रतिसाद

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

लासलगाव | प्रतिनिधी

‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित महिला आरोग्य महोत्सवाला लासलगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील महावीर जैन विद्यालयात आरोग्य महोत्सव पार पडला.

‘देशदूत’कडून शाळेला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात आले. उद्घाटन समारंभाला सरपंच संगीताताई शेजवळ, बाजार समिती सभापती सुवर्णाताई जगताप, माजी जी.प. सदस्य कुसुमताई होळकर, मानद सचिव शांतीलाल सांड, मुख्याध्यापक दिलीप डुंगरवाल, देशदूतचे महाव्यवस्थापक आर के सोनवणे उपस्थित होते.

व्होकार्ट आणि नामको हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळीं बचतगटांची जत्राही आयोजित केली होती. देशदूतच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वच आरोग्य शिबिरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून देशदूतच्या कार्याचा गौरवदेखील अनेकजन करत असतात.

Deshdoot
www.deshdoot.com