Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : देशदूत आयोजित आरोग्य शिबिरास सटाण्यात अभूतपूर्व प्रतिसाद

Photo Gallery : देशदूत आयोजित आरोग्य शिबिरास सटाण्यात अभूतपूर्व प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त देशदूततर्फे आयोजित महिला आरोग्य महोत्सव व बचत गटांच्या जत्रेला सटाणा येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

शेकडो महिला आणि विद्यार्थिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणीसाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आरोग्य महोत्सव आयोजित केला होता.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपीस्ट डॉ रोहन देव, स्त्री रोगतज्ञ डॉ शेखर आमले, दंत रोग तज्ञ डॉ प्रतीक्षा भागवत, डॉ दाभाडे यांनी तपासणी करून उपचार केले.

उदघाटन समारंभाला नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, प्राचार्य सुलभा मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देशदूतच्या वतीने जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने यांनी जिजामाता हायस्कूलला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट दिले. प्राचार्य मराठे व विद्यार्थीनींनी त्याचा स्वीकार केला.

बचत गटांच्या जत्रेत सुमारे 50 च्यावर महिला बचतगटांनी हजेरी लावली. वस्तू खरेदी व खाद्य पदार्थांच्या स्टॅल्सवर सटाणाकरांनी गर्दी केली होती. प्रास्ताविक हेमंत अलोने यांनी तर सूत्रसंचालन सटाणा प्रतिनिधी शशिकांत कापडणीस यांनी केले. देशदूतच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या