Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : दुष्काळात तेरावा; मालेगावात कापड गोदामांना भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

Video : दुष्काळात तेरावा; मालेगावात कापड गोदामांना भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

मालेगाव | प्रतिनिधी 

कापड गोदामांना आज रात्री भीषण आग लागून कापडाच्या साठ्यासह गोदाम जळून भस्मसात झाल्याची घटना घडली. आधीच मालेगावात करोना विषाणूने थैमान घातल्यामुळे सर्वत्र मालेगावमध्ये संचारबंदी आहे. अनेक ठिकाणी परिसर सील केले आहेत. अशातच कोट्यावधी रुपयांचे कापड आगीत जळून खाक झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ मालेगावकरांवर आली आहे.

- Advertisement -

आज रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील खड्डा जीन भागात असलेल्या भवानी ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट तसेच पवन ट्रान्सपोर्टच्या कापड गोदामांना भीषण आग लागली. कापडाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले.

घटनास्थळी मालेगाव मनपाचे अग्निशमन दलाचे तीन बंब आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

सुत कापड व कॉइंस मुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे आगीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या