शिथिलता मिळताच नाशिककर रस्त्यावर; मेनरोड गजबजला; वाईन शॉपबाहेर नंबर लावले
स्थानिक बातम्या

शिथिलता मिळताच नाशिककर रस्त्यावर; मेनरोड गजबजला; वाईन शॉपबाहेर नंबर लावले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

आजपासून पुढे १७ मेपर्यंत टाळेबंदी कायम करण्यात आली आहे. मात्र, काही प्रमाणात आजपासून राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. मॉल वगळून इतर एकल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये वाईन शॉपचाही समावेश आहे. गेल्या ४० दिवसानंतर वाईन शॉप उघडत असल्यामुळे तळीरामांनी आज सकाळपासून वाईन शॉपच्या समोर गर्दी केलेली दिसून आली.

दुकानदारांकडून याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे यासाठी चौकोन आखण्यात आले होते. तर काही उत्साही दुकानदारांनी काल रात्री उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडप टाकून ठेवला आहे. नागरिकांनी प्रचंड गर्दी सकाळपासून वाईन शॉपच्या समोर केलेली दिसून येत आहे.

दुसरीकडे आज गेल्या महिनाभरापासून शुकशुकाट असलेला मेन रोड परिसर आज गजबजलेला असल्याचे दिसून आले. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी याठिकाणी गर्दी केल्यामुळे प्रचंड नेहमीसारखी गर्दी याठिकाणी बघावयास मिळाली.

तसेच शहरात प्रवेश करण्यात येणारया अनेक मार्गांवर वाह्तुक कोंडी झालेली बघायला मिळाली. यामध्ये गणेशवाडी, निमाणी, मालेगाव स्टन्ड परिसर, रामवाडी परिसर, त्र्यंबक नाका आणि द्वारका परिसरातही मोठ्या संख्यने नागरिक रस्त्यावर आलेले दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com