Photo Gallery : अरे हा मेन रोड आहे की जत्रा!
स्थानिक बातम्या

Photo Gallery : अरे हा मेन रोड आहे की जत्रा!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक |  प्रतिनिधी 

नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून टाळेबंदी शिथिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी दुकाने उघडण्यात आली आहेत. याठिकाणी सध्या नागरिकांनी एकाच गर्दी केली असून प्रचंड गर्दी सध्या या रस्त्यांवर होऊ लागली आहे.

महापालिकेकडून करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सम-विषम पद्धतीने, नवीन नियम आणि अटींच्या शर्तीवर शहरातील दुकाने सुरू ठेवण्यात बाबत व्यापारी,दुकानदार सूचना केल्या होत्या. मात्र, या पद्धतीचा फज्जा तर उडालाच शिवाय सामाजिक अंतराचा जो नियम घालून दिला आहे, त्याचाही आज नाशिककरांकडून फज्जा उडालेला दिसून येत आहे.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या मेनरोड परिसरात नाशिककरांनी खरेदीसाठी आज सकाळपासून प्रचंड गर्दी केलेली दिसून आली. रस्त्यामध्ये अनेक वाहने वेडीवाकडी लावेल्यामुळे वाहतुकीत अधिकची भर पडली.

शहरात रविवार कारंजा, ते मेहेर सिग्नल, एमजीरोड परिसर, शालीमार ते संपूर्ण मेन रोडचा भाग प्रचंड गर्दीने आज व्यापलेला दिसून आला. गर्दीचा अंदाज घेऊन अनेक अनधिकृत कपड्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी याठिकाणी रस्त्यावरची दुकाने मांडली.

अनेकांच्या तोंडावर मास्क दिसून आले. मात्र, हातात मोजे नव्हते. अनेकजन पायी चालून खरेदी करत होते तर अनेकांनी दुचाकी दुकानाच्या जवळ घेऊन जात खरेदी केली. काही दुकानांमध्ये ग्राहकांच्या हातावर सनीटायझर देण्यात येत होते, तर अनेकांनी मात्र, सपशेल केराची टोपली दाखवत ग्राहकांची कुठल्याही प्रकारची काळजी घेतलेली दिसून आली नाही.

आज पाहिल्याचं दिवशी ह्या आदेशाला नाशिकच्या दुकांदारांनी केराची टोपली दाखवत सर्वच दुकाने सुरू ठेवली होती. नाशिकच्या एमजी रोड भागातील मोबाइल, इलेक्ट्रॉनिक दुकाना समोर ग्राहकांनीं मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

एकीकडे नाशिक शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून दुसरीकडे मात्र दुकानदारांकडून शासन आदेशाला केराची टोपली दाखवली जातं असल्याचे दिसून येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com