नाशिक शहरात आणखी किती दिवस राहणार ‘प्रतिबंधित क्षेत्र’?; ४० दिवसांत आढळले ४५ करोना बाधित
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात आणखी किती दिवस राहणार ‘प्रतिबंधित क्षेत्र’?; ४० दिवसांत आढळले ४५ करोना बाधित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

१८ रुग्ण करोनामुक्त, २० हजार शहरवासियांचा सर्व्हे

नाशिक । प्रतिनिधी

शहरात गेल्या 40 दिवसात करोना बाधीत रुग्णांची संख्या 45 पर्यत गेली असुन 30 असलेली प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या तीनने कमी होऊन 27 झाली आहे. चौथा लॉकडाऊन सुरू होण्यास काही तास बाकी असले तरी शहरातील नागरिक व वाहनांची वर्दळ पाहता लॉकडाऊन संपला कि काय असे चित्र दिसत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात अडकुन पडलेल्या 20 हजाराच्यावर नागरिकांपैकी 8 हजार नागरिकांची बंधनातून सुटका झाली असुन चार दिवसात अजुन 2 प्रतिबंधीत क्षेत्राचा कालावधी पुर्ण होणार आहे.

जगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा मोठा फटका आता भारताला बसु लागला असुन बाधीतांचा आकडा दररोज हजारोंने वाढत चालल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. देशातील मृत्युचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी असले तरी रुग्णांचा वाढता आकडा सर्वांना सतावत आहे. नाशिक शहरात गेल्या 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता.

नवीन नाशिक भागात असलेल्या गोविंदनगर मनोहरनगर भागातील व्यक्ती ही दिल्ली आग्रा प्रवास करुन नाशिकला पोहचल्यानंतर त्यास करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. याच दिवशी महापालिका आयुक्तांनी शहरातील गोविदंनगर हा परिसर पहिले प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले होते. त्यानंतर 10 एप्रिल रोजी 2, 15 व 16 एप्रिलला प्रत्येक 1 व 24 एप्रिलला 1 असे एप्रिल महिन्यात शहरात 6 प्रतिंबंधीत क्षेत्र जाहीर होऊन यादरम्यान 10 करोना बाधीत रुग्ण आढळून आले होते.

नंतर मे महिन्यात केवळ 10 दिवसात 28 करोना बाधीत रुग्ण वाढत जाऊन पहिल्या 6 प्रतिबंधीत क्षेत्रात 21 प्रतिबंधीत क्षेत्राची भर पडल्याने ही संख्या 27 पर्यत पोहचली गेली होती. नंतरच्या 6 दिवसात (दि.16 मेपर्यत)यात 3 प्रतिबंधीत क्षेत्र आणि एकुण रुग्ण संख्या 45 पर्यत जाऊन पोहचली आहे. दरम्यान गेल्या 40 दिवसात शहरात 45 बाधीत झाले असले तरी यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहे.

तर या कालावधीत केवळ 2 मृत्यु झाले असुन यात मालेगांव येथे बंदोबस्तास जाऊन बाधा झालेल्या पोलीस सेवकांचा समावेश आहे. सध्या नाशिक शहरातील मृत्युचे अल्प प्रमाण आणि बाधी घरी जाण्याचे प्रमाण निम्म्यापर्यत पोहचले असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

3 क्षेत्र वगळले ; 8 हजार नागरिकांना दिलासा

गेल्या 40 दिवसात 30 भागात करोना बाधीत आढळल्याने याठिकाणी 1000 मीटर क्षेत्र रेड व बफर झोन असे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. यातील नाशिकरोड धोंगडे मळा, सातपूर अंबड लिंकरोड संजीवनगर व वृंदावननगर म्हसरूळ अशा तीन प्रतिबंधीत क्षेत्रातील चौदा दिवसांचे सर्व्हेक्षण पुर्ण झालेले असल्याने हे तीनही भाग प्रतिबंधीत क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. या आयुक्तांच्या आदेशामुळे याभागात घरात अडकुन पडलेले सुमारे 8 हजार नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या भागात आता सकाळी 9 ते सायं. 5 पर्यत व्यवहार सुरळीत झाले आहे.

100 वैद्यकिय पथकांकडुन आरोग्य तपासणी

दीड महिन्याच्या कालावधीत नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकिय विभाग वैद्यकिय अधिकारी, मलेरिया कमर्र्चारी व आशा वर्कर यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांकडुन करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. शहरात जसजसे करोना बाधीत रुग्ण आढळले, तस तसे तो भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करीत आयुक्तांकडुन याठिकाणी वैद्यकिय विभागाच्या अधिकार्‍यावर सर्व्हे समन्वयक म्हणुन जबाबदारी दिली होती. एकुण 30 प्रतिबंधीत क्षेत्रात 100 पथकाकडुन घरोघरी जाऊन जाऊन आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात आले. यामुळे बाधीतापासुन इतरांना संसर्ग झाला नाही. तसेच बाधीतांपैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची कालावधी स्थिती
प्रतिबंधीत क्षेत्र नाव कालावधी सुरू कालावधी पर्यत

गोविंदगर (न.नाशिक) 6/4/2020 -18/5/2020

नवश्या गणपती 10/42020 – 22/5/ 2020

समाज कल्याण का. 15/5/2020 – 27/5/2020

सावतानगर(न.नाशिक) 2/5/2020 – 13/6/2020

उत्तमनगर(न.नाशिक) 2/5/2020 – 13/6/2020

पाथडी फाटा परिसर 2/5/2020 – 13/6/2020

सातपूर कॉलनी 2/5/2020 – 13/6/2020

जनरल वैद्यनगर 3/5/2020 – 14/6/2020

बजरंगवाडी 5/5/2020 – 16/6/2020

शांतीनिकेतन चौक 6/5/2020 – 17/6/2020

माणेक्षानगर द्वारका 6/5/2020 – 17/6/2020

समतानगर टाकळीरोड 7/5/2020 – 18/6/2020

पाटीलनगर न.नाशिक 8/5/2020 -19/6/2020

हनुमानचौक न.नाशिक 8/5/2020 – 19/6/2020

जाधव संकुल 8/5/2020 – 19/6/2020

हिरावाडी पंचवटी 8/5/2020 – 19/6/2020

श्रीकृष्णनगर 8/5/2020 – 19/6/2020

इंदिरानगर 9/5/2020 – 20/6/2020

तारवालानगर 9/5/2020 – 20/6/2020

हिरावाडी आयोध्यानगरी 9/5/2020 – 20/6/2020

कोणार्कनगर नं. 2 9/5/2020 – 20/6/2020

धात्रक फाटा सागर व्हि.9/5/2020 – 20/6/2020

धात्रकफाटा हरि दर्शन 9/5/2020 – 20/6/2020

सिन्नर फाटा ना.रोड 10/5/2020 – 21/6/2020

काठे गल्ली द्वारका 13/5/2020 – 4/6/2020

नवश्या गणपती(2) 14/5/2020 – 25/6/2020

पंडीतनगर न. नाशिक 14/5/2020 – 25/6/2020

Deshdoot
www.deshdoot.com