अबब ! चक्क 10 कोटींचा घोडा

अबब ! चक्क 10 कोटींचा घोडा

सारंगखेडा – 

लाखोंची कार किंवा करोडोची घरांच्या किंमतीपेक्षा अनेक पटीने जास्त किंमत एखाद्या प्राण्याची असू शकते, असे कधी ऐकिवात नसेल. परंतू सारंगखेडयाच्या घोडेबाजारात असाच एक लक्झरी कार पेक्षाही जास्त किंमत असलेला शान नावाचा घोडा आकर्षण ठरला आहे. त्याची किंमत तब्बल दहा कोटी रुपये आहे.

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणारा अश्व बाजार प्रसिद्ध आहे. या अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाली आहे. अश्व बाजारात तीन हजार अश्व दाखल झाले आहेत.

त्यापैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंत लाखोंवर आहे. आतापर्यत अश्व बाजारात दोन कोटी रुपयांपयर्ंत किमंतीचा घोडा आला आहे.

यंदा, मात्र, त्या किमतीचा विक्रम तुटला आहे. भारतातील अश्व चॅपियन शान नावाचा अश्व ज्याची किंमत तब्बल दहा कोटी रुपये आहे. हा आशिया खंडातील आलिशान नावाच्या अश्वाचा नातू व शानदार नावाच्या अश्वाचा मुलगा आहे.

हा पंजाब राज्यातून पटीयाला येथून आला असून त्याची उंची 6 फुट 6 इंची इतकी आहे. येथील चेतक फेस्टिव्हल प्रांगणात व्हीआयपी कक्षात त्याची 50 बाय 50 च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. त्याच्या खाण्यापिण्यासह देखरेखीसाठी एक लाख रुपये खर्च आहे. त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com