Friday, April 26, 2024
Homeनाशिकआज नाशिकमध्ये आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’

आज नाशिकमध्ये आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे ‘हिस्ट्री’

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात आज आज दिवसभरात १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  यात नाशिक शहरातील १० जणांचा समावेश आहे. यात शहरातील दिंडोरी रोड येथील २, वडाळा येथील १, पखालरोड १, नवीन नाशिकचे पंडित नगर येथील १, जत्रा हॉटेल १, कॅनॉलरोड, नाशिकरोड १, तृप्तीनगर, टाकळीरोड १, पंचवटीतील क्रांतीनगर येथील १, हनुमाननगर येथील १ असे रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा १२८  वर पोहचला आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात आतापर्यंत २५ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. एकूण ७ रुग्णांचे मृत्यू झाले असून आतापर्यंत ४२ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात ७९ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज आढळून आलेले चंपानगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील ३८ वर्षीय व २० वर्षीय पुरुष यांच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  क्रांतीनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील २५ वर्षीय युवकच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आगर टाकळी येथील रुग्णाच्या संपर्कातील हनुमान नगर पंचवटी येथील रहिवासी असणारा २७ वर्षीय युवकाच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचवटी महालक्ष्मी टॉकीज येथील रुग्णाच्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलाचा व ३६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

पंडित नगर सिडको येथील रुग्णाच्या संपर्कातील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर पखाल रोड येथील रुग्णच्या संपर्कातील ७३ वर्षीय वृद्धाच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

वडाळा गाव येथील रुग्णाच्या संपर्कातील ५९ वर्षीय व्यक्तीचा स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच श्रीराम नगर जत्रा हॉटेल जवळ येथील रुग्णाच्या संपर्कातील ६४ वर्षीय पुरुषाच्या स्वाबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पोलीस हेडकॉर्टर येथील ३६ वर्षीय ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  चंपा नगरी नाशिकरोड येथील रुग्णाच्या संपर्कातील कॅनॉल रॉड जेलरोड येथील रहिवासी ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज शहरातील एकूण १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात १० पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या