Photo Gallery : अडीच तास पावसाचा नाशिक शहरात ‘मुक्काम’; पावसाचे काही निवडक छायाचित्रे

Photo Gallery : अडीच तास पावसाचा नाशिक शहरात ‘मुक्काम’; पावसाचे काही निवडक छायाचित्रे

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने आज हजेरी लावली. शहरात तब्बल अडीच तासांपेक्षा जास्त वेळ पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

कालच राज्यात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर आज नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळला. मात्र, हवामान अभ्यासकांकडून आजच्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असल्याचे संबोधले गेले आहे.

असे असले तरीदेखील यंदाच्या हंगामातील हा पहिलाच जोरदार बरसलेला पाऊस असल्यामुळे नाशिककरांनी मनोभावे या पावसाचे स्वागत केले. अनेकांनी फोटो व्हिडीओ शेअर करत पावसाचे स्वागत केले.

नाशिक शहरात आज बरसलेल्या पावसाने तब्बल अडीच तासांपेक्षा अधिक काळ मुक्काम केला. यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे दमदार आगमन झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात ४४ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.

त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच जर पावसाने दमदार आगमन केले तर धरणातील पाणीसाठा वाढेल परिणामी गोदावरीला पूर येण्याची शक्यता यंदा अधिक असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे.  नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रात काहीच्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, देशदूत

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com