सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांची आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप; नातेवाईकांचा सिव्हीलसमोर ‘ठिय्या’

सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांची आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप; नातेवाईकांचा सिव्हीलसमोर ‘ठिय्या’

नाशिक | प्रतिनिधी 

हैद्राबाद पोलिसांनी घरफोडीतील सोने खरेदी केल्याप्रकरणी नाशिकचे सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.

मात्र, हि आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात ठिय्या मांडला आहे.  हैद्राबाद येथील पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी नातेवाईकांनी प्रचंड गर्दी याठिकाणी केली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शहर पोलिसांची कुमक दाखल झाली आहे. मयत विजय बिरारी यांच्या नातेवाईकांनी पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडे घटनेची चौकशी करण्याची मागणी करत हैद्राबाद पोलिसांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

उद्या सराफ असोसिएशनचे आंदोलन 

आजच्या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी उद्या नाशिक जिल्ह्यासह सराफ असोसिएशनकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सराफ असोसिएशनकडून देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी अशी मागणी सराफ असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com