जळगाव : समता नगरात आरोग्य निरीक्षकास मारहाण
स्थानिक बातम्या

जळगाव : समता नगरात आरोग्य निरीक्षकास मारहाण

Balvant Gaikwad

सहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ, रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

मास्क लावण्याचे सांगितल्याच्या राग येवून सात ते आठ जणांच्या टोळक्याने समता नगरात मनपा आरोग्य निरीक्षकास मारहाण व सहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ करणे, अंगावर धावून येणे असा प्रकार घडला असून त्यांचेविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक उपायुक्त पवन पाटील यांनी दिली.

येथील समता नगरात नेहमीप्रमाणे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त पवन पाटील हे आपल्या टीमसह गेले होते. या ठिकाणी याच परिसरातील काही नागरिकांच्या तोंडाला मास्क नव्हता.

मास्क लावण्यास सांगितले असता या गोष्टीचा राग येवून त्यांनी अन्य ६ ते ७ लोकांना बोलवून सहाय्यक आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला ते एवढ्यावरच न थांबता सहाय्यक आयुक्त यांना शिवीगाळ करीत आरोग्य निरीक्षक कुणाल बारसे व मुकादम उज्ज्वल बेंडवाल यांना मारहाण केली.

तक्रार दाखल

याबाबत रामानंद नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा उपायुक्त मिनीनाथ दंडवते, अभियंतेसह मनपाचे इतर पदाधिकारी गुन्हा दाखल करतेवेळी रामानंद पोलिस स्टेशनला उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com