कोल्ड्रिंक्समधे विष देऊन प्रतिक्षाची हत्या
स्थानिक बातम्या

कोल्ड्रिंक्समधे विष देऊन प्रतिक्षाची हत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पिंप्री-पंचम (ता.मुक्ताईनगर)येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय विवाहितेचा गुजरातमधील वापी येथे ऊद्योगामुळे स्थायिक झालेल्या केऱ्हाळे बु.(ता. रावेर) येथील युवकाशी दोन महिन्यापूर्वी झाला होता.दि.३,रविवारी पहाटे तिचे ह्द्र्यविकाराने निधन झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीनेच कोल्डड्रिंक मध्ये विष देवून हत्या केल्याचा प्रकार शवविच्छेदन रिपोर्ट मधून उघडकीस आल्याने,मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीवर खुनाचा व सासू,जेठ-जेठाणी यांच्यावर मानसिक शारीरिक छळाचा गुन्हा डुंगरा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
येथील प्रतीक्षा ज्ञानेश्वर महाजन हिचा विवाह केऱ्हाळे बु  येथील रहिवासी तथा गुजरात राज्यातील वापी छरवाडा येथिल खोडीयारनगरमधील श्रद्धा इंजिनिअरीग नावाच्या कंपनी असलेल्या सुभाष पाटील यांचा मुलगा चंदन(चेतन) सुभाष पाटील याच्याशी २७ फेब्रुवारीला चापोरा(म.प्र.)येथे संपन्न झाला होता.
अवघ्या दोन महिन्यात चंदन याचे दारूचे व्यसन व अनैतिक संबधाची भनक प्रतीक्षाला लागल्याने तिला पती व सासू जेठाणी शारीरिक व मानसिक छळ करायला लागल्याने,तिने हि माहिती वडिलांना दिली होती.मात्र कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्याने वडिलांनी काही दिवस धीर धरण्याचा तिला सल्ला दिला होता.
यादरम्यान दि.२ मे च्या रात्री तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर हार्ट अटॅॅकमुळे निधन झाल्याचा बनवा करण्यात आला होता.प्रतीक्षाच्या अंत्यविधीला गेलेल्या नातेवाईकांना प्रतीक्षाच्या गळ्यावर जखमांचे व्रण दिसल्याने,नातेवाईकांनी  हत्येचा संशय व्यक्त केला होता.
यानंतर व्हिडीओ रेकॉर्डिंग करून शवविच्छेदन केले असता,या रिपोर्ट मध्ये कोल्ड्रिंकमधून जहर दिल्याचे व गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यावर पती चंदन याने कबुली दिल्याने,डुंगरा पोलिसांत प्रतीक्षाच्या हत्येचा गुन्हा नोंद  करून त्याला अटक करण्यात आली आहे.तर सासू,जेठ,जेठाणी यांच्यावर शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com