प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल
स्थानिक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गुगल’ ने खास डुडल बनवत प्रजासत्ताक दिनाचा आनंद अधोरेखित केला आहे. या विशेष डुडलमधून गुगलने भारताच्या विविध कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. गुगल भारतातील महत्वाचे सण उत्सव तसेच विशेष व्यक्तींवर खास डुडल तयार करून मानवंदना देत असते.

संपूर्ण भारतात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गुगलने डुडल तयार करत लक्ष वेधले आहे. डुडलमधून कला आणि संस्कृतीचा मिलाप दाखविण्यात आला आहे.

ऐतिहासिक ताजमहाल आणि इंडियागेट यांच्यासह विविध राज्यामधील संस्कृती दाखविण्यात आली आहे. उत्तरेपासून दक्षिण भारतातील विविध कलांचा संगम या डुडलमध्ये करण्यात आला आहे. देशातील पर्यटन, संगीत कलेचा वारसा, सण उत्सव, शेतीचे महत्व या डुडलमध्ये ठळकपणे दाखवण्यात आले आहे. सिंगापूरमधील आर्टिस्ट मेरू सेठ यांनी आजचे प्रजासत्ताक दिन विशेष डुडल डिझाइन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com