Thursday, April 25, 2024
Homeनाशिकघोटी येथील डॉक्टरला इगतपुरी न्यायालयाने सुनावली तीन वर्षाची शिक्षा व दहा हजाराचा...

घोटी येथील डॉक्टरला इगतपुरी न्यायालयाने सुनावली तीन वर्षाची शिक्षा व दहा हजाराचा दंड

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुका न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश श्रीमती आर. एन. खान यांनी दि. २० रोजी लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अधिनियम सन २००३ च्या तरतुदीचे कलमाअतंर्गत तालुक्यात पहिलाच गुन्हा सिद्ध करीत घोटी येथील डॉ. प्रविण मोतीराम निकम यांना लिंग निवडीस प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिक्षा सुनावल्याने तालुक्यातील डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात दि. ११ / ९ / २००१८ रोजी लींग निवडीस प्रतिबंध कामी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धडक मोहीमेत घोटी येथील मानसी डायग्नोस्टीक सेंटर येथे धाडसत्र मोहीम राबविली होती. यावेळी घोटी ग्रामिण रूग्णालयाचे डॉ. संजय सदावर्ते यांच्या लींग निवडीस बाबत काही पुरावे लक्षात येताच त्यांनी मानसी डायग्नोस्टीक सेंटरचे डॉ. प्रविण निकम यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.

संबधित गुन्हयातील न्यायालयीन कामकाज सरकारी विशेष सहाय्य अभियोक्ता अँड. रेश्मा युवराज जाधव व विधी समोपदेशक आरोग्य विभागाच्या अँड. सुवर्णा शेफाळ यांनी काम पाहीले.

लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम सन २००३ च्या कायदा तरतुदीचे उल्लघंन केल्यामुळे डॉ. प्रविण मोतीराम निकम यांना सदर कायदा कलम ४ व ६ आणि अधिनियम ९ / ( ४ ) चे १० ( १ अ ) चे उल्लघंन केल्यामुळे हा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी डॉ. निकम यांना प्रत्येक कलमा प्रमाणे ३ वर्ष साधी कैद व कलम ४ प्रमाणे ३ वर्ष.साधी कैद प्रत्येक तीन कलमाप्रमाणे १० हजार रुपये दंड अशी शिक्षा यावेळी मुख्य न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान यांनी सुनावली. तालुक्यात शिक्षा होण्याची ही पहीलीच घटना असुन यामुळे वैद्यकीय वर्तुळात डॉक्टर व डायग्नोस्टीक सेंटर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या धडक मोहीमे अंतर्गत मानसी डायग्नोस्टीक सेंटरमध्ये अनेक कागद पत्रांची अपुर्तता व महत्वाचे एफ फॉर्ममध्ये त्रुटी आढळुन आल्यामुळे वैद्यकीय व शासन वरिष्ठाच्या मान्यतेमुळे गर्भ धारणा व प्रसुत पुर्व निदान तंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम ) सन २००३ च्या कायद्याचे उल्लघंन केल्याने इगतपुरी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात सरकार पक्षाकडुन एकुण ६ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सहाय्य अभियोक्ता अँड. रेश्मा युवराज जाधव व विधी समोपदेशक आरोग्य विभाग नाशिक यांनी सबंधीत गुन्हयाचे काम पाहिले.

डॉ. प्रविण निकम या आरोपी विरूध्द सबळ पुरावा सरकारी पक्षाने आणल्याने तो न्यायालयाने मान्य केल्याने सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा फरमविण्यात आली अशी माहिती अँड. रेश्मा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपीने आदेशीत न्यायालयीन दंड न भरल्यास आरोपीला १ महिन्याचा साधा कारावासाची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार एक वर्षाच्या आत या केसचा निकाल लागला असल्याची माहीती अँड रेश्मा जाधव यांनी दिली. यावेळी वकील संघाचे अँड. युवराज जाधव, अँड. सुवर्णा शेफाळ, पोलीस हवालदार एस. टी. थोरात आदि उपस्थित होते.

देशात व राज्यात मुलींचा जन्मदर कमी झाल्यामुळे तो वाढला पाहीजे यासाठी आरोग्य विभागा मार्फत धडक मोहीम राबविली जाते. अशा कारवाईमुळे लिंग निवडीस प्रतिबंघ होवुन मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी निश्चितच मदत होईल. सरकारी पक्षातर्फे सबंधित गुन्हयातील शिक्षा ही इगतपुरी तालुक्यातील पहिलीच घटना असुन कायद्यामुळे कारवाई झाली आहे. त्यामुळे लिंग निवडीस प्रतिबंध आळा बसेल.

  • अँड. रेश्मा युवराज जाधव, सरकारी विशेष सहाय्य अभियोक्ता
- Advertisment -

ताज्या बातम्या