घोटी : शेतजमीन विकण्याचा घाट घातल्याने ‘त्या’ बाप-लेकाचा खून
स्थानिक बातम्या

घोटी : शेतजमीन विकण्याचा घाट घातल्याने ‘त्या’ बाप-लेकाचा खून

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी । कर्ज फेडण्यासाठी शेतजमीन विकण्याचा घाट घातल्याने तीन भावांनी संगनमत करून वडिलांसह आजोबाचा निर्घृण खून केल्याची घटना घोटी खुर्द येथे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासचक्र वेगाने फिरवून संशयिताना 24 तासांच्या आत ताब्यात घेतले.

काशिराम वामन फोकणे (65), ज्ञानेश्वर काशिराम फोकणे (48) ही मृत बाप-लेकाची नावे आहेत.

ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. घोटी खुर्द येथे ज्ञानेश्वर काशीराम फोकणे हे पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. तर वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे शेतात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे.

दररोज आपल्या वडिलांना जेवण घेऊन कोणी ना कोणी मळ्यात येत असत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेावर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले होते. मात्र रात्री दीडच्या सुमारास दोघांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून निर्घृण खून केला. ही घटना शेतातील घरात घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. वाडीवर्‍हे पोलिसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांंनी तपासचक्रे वेगाने फिरवून घरतील व्यक्तींना विश्वासात घेत खुनाचा छडा लावला.

वडिलांंचे अनैतिक संबंध,घरातील भांडणे,डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा घाट, त्याला आजोबांची साथ याला कंटाळून किरण,प्रमोद ,नितीन या तिन्ही भावांनी संगनमत करून वडील व आजोबाचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले.

Deshdoot
www.deshdoot.com