देवळाली कॅम्प गोळीबार प्रकरणी चौघांना बेड्या

देवळाली कॅम्प गोळीबार प्रकरणी चौघांना बेड्या

देवळाली कॅम्प | वार्ताहर

वंचित बहुजन आघाडीचे नेते विलास पवार यांच्या मुलावर काल गोळीबार झाल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असतानाच आज पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास पवार यांचा बिट्टू पवार हा मुलगा देवळाली कॅम्प येथील हाडोळा परिसरातील डॉ,आंबेडकर सोसाईटीत राहतो. रात्री दहाच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी गोळीबार करून पोबारा केल्याची घटना घडली होती. यामध्ये बिट्टूच्या मांडीजवळ गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला ताबडतोब नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, पोलीस घ्त्नास्थाली ताबडतो दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली होती. याप्रकरणी आज देवळाली पोलिसांनी 1.सनी बाजीराव कदम वय 27, 2.भुपाल मुनिंद्र कनोजिया वय 26, 3.प्रकाश संजय साळवे वय 30, 4.गणेश मारूती साळवे वय 38, सर्व. रा.हाडोळा,देवळाली कॅम्प यांना अटक केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com