राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
स्थानिक बातम्या

राज्यात कोरोनाचा सातवा बळी, मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

Dinesh Sonawane

मुंबई : प्रतिनिधी

करोना विषाणूमुळे मुंबईत एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या महिलेवर मुंबईतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू होते.

कालपर्यंत सहा वर असलेली राज्यातील मृत्यूंची संख्या आता सातवर पोहोचली आहे. या महिलेला हायपरटेन्शन त्रास होता, त्यांमुळे या महिलेला शनिवारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या छातीत दुखत होते तसेच श्वसनालाही त्रास होत होता. त्यामुळे या महिलेची परिस्थिती गंभीर बोलली जात होती.

दरम्यान, महिलेला दवाखान्यात दाखल करताच तिची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यामध्ये या महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अखेर आज या रुग्णालयात महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

Deshdoot
www.deshdoot.com