जळगाव : जिल्ह्यात नव्याने आढळले पाच पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात नव्याने आढळले पाच पॉझिटिव्ह रुग्ण

चार रुग्ण एकट्या अमळनेरातील तर जळगावातील एकाचा समावेश ; मुंगसेच्या महिलेचा दुसराही अहवाल निगेटीव्ह

येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 58 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यापैकी 53 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एकूण पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच व्यक्तीमध्ये 31, 43 व 60 वर्षीय महिलांचा तर 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. े चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. तर एक जळगाव येथील, एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील महिलेचा 14 दिवसांनंतरचा दुसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या समतानगर, जळगाव (मुळगाव चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) येथील महिलेचे वडील आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील 11, पारोळा येथील 14, पाचोरा येथील चार तर जामनेर येथील एका तर 14 व्यक्ती या अमळनेर येथील तर दोन व्यक्ती जळगाव च्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 57 इतकी झाली आहे. त्यापैकी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

15 दिवसात महिला कोरोनातून झाली बरी

जळगावातील मेहरुण परिसरात पहिला यानंतर शहरातीलच सालार नगरातील दुसरा कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला होता. यापैकी सालारनगरातील रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर उपचारात मेहरुण परिसरातील कोरोनाबाधीत रुग्ण बरा झाला होता. यानंतर 17 एप्रिल रोजी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द कोरोना संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल झाली होती. दुसर्या दिवशी 18 रोजी दिवसा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती महिला कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपासून तिच्यावर कोरोना रुग्णालयात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरासह पारिचारिक, परिचारीका तसेच स्टॉप यांनी उपचार केले. उपचारात अवघ्या 15 दिवसातही वृध्द महिला कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान या महिलेला दोन दिवस कोरोना रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. यानंतर ती प्रकृती चांगली असल्यास तिला डिचार्ज देण्यात येणार आहे.

बाधितांची संख्या झाली 57

जिल्हयात आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या रविवार पर्यंत 57 एतकी होती. मात्र सोमवारी यात आणखी पाच रुग्णांची भर पडल्याने ही संख्या आता 57 वर जावून पोहचली आहे. सोमवारी आढळून आलेल्या पाच जणांपैकी चौघे एकट्या अमळनेरातीलच आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा अमळनेर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी व सोमवारी अमळनेार तालुक्यातील मुंगसे येथील कोरोना पॉझिटिव्ह महीलेचा 14 दिवसांनतरचा पहीला व दूसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळालेला असतांनाच पुन्हा चार रुग्ण अमळनेरातच आढळल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारच्या या अहवालांमुळे अमळनेरकरांची चिंता वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com