जळगाव : जिल्ह्यात आणखी पाच करोना बाधित रूग्ण आढळले
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आणखी पाच करोना बाधित रूग्ण आढळले

Balvant Gaikwad

नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी ५६ व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

यापैकी ५१ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *पाच* व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील १५ वर्षीय मुलगा, अमळनेर येथील ५५ वर्षीय, पाचोरा येथील ५६ वर्षीय, तर जळगाव येथील ३० व ५७ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३७ झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील ५१ व्यक्तींपैकी १६ व्यक्ती या अमळनेरच्या, ६ व्यक्ती पाचोरा, ४ व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com