धान उत्पादकांसाठी खुशखबर; क्विंटलमागे पाचशे रूपयांच्या अनुदानास मान्यता
स्थानिक बातम्या

धान उत्पादकांसाठी खुशखबर; क्विंटलमागे पाचशे रूपयांच्या अनुदानास मान्यता

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

सन २०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे.

त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता.

या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com