स्थानिक बातम्या

धक्कादायक : मालेगावमध्ये पुन्हा पाच कोरोना पॉझिटीव्ह; जिल्ह्यातील आकडा वाढला

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये पुन्हा कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मध्यरात्री आलेल्या नमुन्यांपैकी पाच नमुने कोरोना सिद्ध झाले असून मालेगावमध्ये आता १५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर नाशिकमध्ये चार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता २० झाला आहे. यामध्ये मालेगावातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन रुग्णांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्णाचीदेखील दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. काल (दि. ११) नाशिक जिल्ह्यातील 53 अहवालांपैकी 5 जण पुन्हा पॉजिटीव्ह आढळून आले आहेत.  तर  शहरातील 31 पैकी 31 अहवाल निगेटिव्ह आहेत. मालेगाव मधील 17 पैकी 5 लोक पॉजिटीव्ह आहे यात 3 महिला 2 पुरुषांचा समावेश आहे.

आज सकाळी 8 वाजेच्या आकडे वारी नुसार नाशिक शहर ४,  लासलागाव 1,  मालेगाव 10 + 5 = 15 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्ण नाशिक जिल्ह्यात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com