Friday, April 26, 2024
Homeनाशिकपहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह; दोन दिवसांनी मिळणार डिस्चार्ज

पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह; दोन दिवसांनी मिळणार डिस्चार्ज

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त असलेल्या लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील युवकाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यास दोन दिवसांनी मुक्त करण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पिंपळगाव नजीक येथे २५ मार्च रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता तर त्याचदिवशी त्याचे स्वब तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.त्याचे अहवाल २७ मार्च राजी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण त्याच्या रुपाने आढळाला होता.

सदरचा युवक हा नगर येथे गेला असता त्यावेळी तो पॉझिटिव्ह रुग्णालच्या संपर्कात आला होता. त्याच्या कुटुंबियाचेही स्वब घेतले असता, ते निगेटिव्ह आले होते.

‍१४ दिवस त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याचा दुसरा स्वब निगेटिव्ह प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. तर १५ व्या दिवसाच्य स्वबचे अहवालही शनिवारी प्राप्त झाला असून तोही निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

तरीही त्याच्यावर आणखी दोन दिवस उपचार सुरू राहतील. त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. हा जिल्ह्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण होता आणि कोरोना मुक्त होणाराही तोच जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या