सटाण्यात एक करोना पॉझिटिव्ह; बजरंगवाडीसह, मालेगाव सिन्नर, येवल्यातही रुग्ण आढळले
स्थानिक बातम्या

सटाण्यात एक करोना पॉझिटिव्ह; बजरंगवाडीसह, मालेगाव सिन्नर, येवल्यातही रुग्ण आढळले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देशदूत डिजिटल चमू

आज सकाळी आलेल्या अहवालात ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बागलाण तालुक्यात एक रुग्ण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बागलाणकरांनी शहरासह तालुक्यात करोना पसरू नये यासाठी खबरदारी घेतली होती. मात्र, आज रुग्ण आढळून आल्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज एकूण ८० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ७५ अहवाल निगेटिव्ह तर इतर ५ अहवाल बाधित आढळून आले आहेत. बाधित पाच रुग्णांमध्ये मालेगाव  सटाणा, सिन्नर येवल्यासह नाशिक शहरतील बजरंग वाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढलेली आली. तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ५६ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामधील  ७ जणांचे अहवाल बाधित आढळून आले आहे. यानंतर आज सटाणा, सिन्नर आणि येवला येथेही रुग्ण आढळून आले आहेत.

आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे मालेगावमधील रुग्णसंख्या ३४३ वर पोहोचली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८७ वर पोहोचली. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १२ रुग्ण दगावले आहेत.

आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक २० वर्षीय तरुणीसह तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील नाशिक मनपा परिक्षेत्रात १८ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत ०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसरीकडे नाशिक आणि मालेगाव ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढली असून ती २० वर पोहोचली आहे. तर ग्रामीण भागातील आतापर्यंत दोघे करोना मुक्त झाले आहेत.

मालेगाव महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ३२ रुग्ण बाधित आढळून आले असून त्यांच्यातील २० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १२ करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.  नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांची संख्या  ६ वर पोहोचलेली आहे.

आज आढळून आलेले रुग्ण कुठले?

  • सटाणा शहरात आढळून आलेल्या रुग्णाचे वय ५७ असून फुलेनगर परिसरातील रुग्ण असल्याची माहिती आहे.
  • सिन्नर तालुक्यात ३४ वर्षीय महिला बाधित आढळून आली असून वडगाव आव्हाड मळा परिसरातील ही महिला आहे.
  • नाशिक शहरातील २० वर्षीय तरुणी ही बजरंग वाडी येथील आहे.
  • येवला शहरातील एका महिला २७ वर्षीय बाधित आढळून आली आहे.
  • मालेगाव शहरात एका ७० वर्षीय वृद्धेचा अहवाल बाधित आढळून आला असून ही महिला नयापुरा परिसरातील असल्याचे समजते.

येवल्यात आतापर्यंत ९ करोना बाधित

येवल्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९ वर पोहोचल्याने नागरिक धास्तावले आहेत. रात्री उशिरा आलेल्या अहवालात येवल्यातील एक परिचारिका असेलेली माहिती पॉझिटिव्ह आल्याची प्राथमिक माहिती आहे. करोना बाधित परिचरिकांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आदेशापर्यंत बंद

सटाणा शहरात करोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (०६) पासून पुढील आदेश येईपर्यंत सटाणा बाजार समितीतील सर्व लिलाव कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. कोणीही बाजार समितीत लिलावसाठी शेतमाल आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com