नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार
स्थानिक बातम्या

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नागपूर | वृत्तसंस्था 

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या घटनेत जोशी यांच्यासह परिवार थोडक्यात बचावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यात आली होती. यादरम्यान, अज्ञात व्यक्तींकडून त्यांना धमकीचे पत्र आले होते. दरम्यान, जोशी यांनी पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली होती.

दरम्यान, काल रात्री जोशी यांच्यासह त्याच्या परिवारातील सदस्य ७-८ कारमधून वर्धा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तिथून परतत असताना अचानक जोशी यांच्या गाडीवर दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. पहिली गोळी पहिल्या खिडकीच्या काचेवर, दुसरी दुसऱ्या खिडकीच्या काचेला चाटून गेली. या घटनेतून संदीप जोशी यांच्यासह परिवारातील सदस्य बचावले आहेत.

घटनेची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली असून ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराचा प्रथम नागरिक असलेल्या महापौरांवरच प्राणघातक गोळीबाराची घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com