नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी चाचपणी; दिग्दर्शक नाशकात दाखल

नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी चाचपणी; दिग्दर्शक नाशकात दाखल

file photo

नाशिक । प्रतिनिधी

एकदंत फिल्म्स् व अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने नाशिक नगरीत चित्रीकरणाची स्थळे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फ परवानगी देण्यात आली आहे. चित्रकरण स्थळे पाहण्यासाठी दिगदर्शक नाशिकला येणार असून त्यांना पास देण्यात आले आहे.

‘मोशनस्केप एंटरटेनमेंट’ निर्मित प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाची स्थळे पाहण्यासाठी नाशिक नगरीत दि. 3 ते 6 जून या दरम्यान येणार असून स्थळाची निश्चिती झाल्यानंतर पुढील महिन्यात प्रत्यक्षात चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापनाकडे एकदंत फिल्म्सच्या वतीने लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी यांनी विनंती अर्ज केला होता. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने अटी व शर्ती ठेवत चित्रीकरण स्थळ पाहण्यासाठी पास दिले आहेत.

चित्रपट निर्मात्यांनी शुटींगसाठी नव्हे तर लोकेशनची पाहणी करण्यासाठी परवानगी मागितली असून जिल्हा प्रशासनाकडून त्यांना पास देण्यात आला आहे. घोटी – सिन्नर रोड, वैतरणा व भावली धरण, देवळाली कॅम्प, सुला व सोमा वाईन आदी ठिकाणी शुटींगसाठी पाहणी केली जाणार आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

चित्रीकरण बंद असल्याने अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या परवानगीमुळे कोरोना वायरस सारख्या भीषण महामारीला कंटाळून नैराश्याने ग्रासलेल्यांना आशेचा किरण दिसत आहे. कलाक्षेत्रातील आम्हा सर्वांना काम तसेच शासनाला महसूल, हॉटेल व्यावसायिक, स्थानिक केटरर्स, वाहतूक व्यवस्थापक यांच्या व्यवसायास चालना मिळेल.

अमित कुलकर्णी, लाईन प्रोड्युसर, एकदंत फिल्मस्

अटी व शर्ती

  • वाहन चालक यांनी वाहनाचे सॅनेटायझर करुन घेणे बंधनकारक
  • सर्व संबंधितांची नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेणे बंधकारक
  • प्रवास करताना आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करणे बंधनकारक
  • सामाजिक अंतराचे पालन करावे.
  • मॉस्क वापरणे अनिवार्य
  • प्रवास करण्यापूर्वी व झालेनंतर सर्व प्रवासी यांनी आरोग्य तपासणी करुन घेणे बंधनकारक

या स्थळाची पाहणी

घोटी-सिन्नर रोड, सिन्नर डुबरे, शिवडे, त्र्यंबक वैतरणा रोड, वैतरणा धरण, भावली धरण, देवळाली कॅम्प स्थित बंगला, सुला व सोमा वाईन यार्ड इत्यादी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com