जळगाव : जिल्ह्यात आणखी पंधरा करोना बाधित रूग्ण आढळले
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आणखी पंधरा करोना बाधित रूग्ण आढळले

Balvant Gaikwad

जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या  346

जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, रावेर, शेंदूर्णी, पहूर आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 134 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 119 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंधरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील तेरा, सावखेडा, ता. पाचोरा येथील एक व रावेर येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 38 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com