स्थानिक बातम्या

अमळनेरातील पॉझिटिव्ह दांपत्याच्या संपर्कातील ११ जण जिल्हा रुग्णालयात दाखल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

अमळनेरातील कोरोना पॉझिटिव्ह या ५२ वर्षीय मृत महिलेसह तिच्या ६० वर्षीय पॉझिटिव्ह पतीच्या संपर्कातील ११ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात २२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्क्रिनिंग ओपीडीत एकूण ९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोरोना संशयित म्हणून २५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ४५५८ रुग्णांना रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले.

आतापर्यंत पाच पॉझिटिव्ह

आतापर्यंत एकूण ३५६ संशयित रुग्णांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी २८८ अहवाल निगेटिव्ह, पाच अहवाल पॉॅझिटिव्ह आले आहेत. दोन स्वॅब नाकारलेले आहेत. तर उर्वरित ६१ अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्हा रुग्णालयात २१ रोजी कोरोना संशयित एकूण तीन रुग्णांंचा मृत्यू  झालेला आहे. त्यांचे स्वॅब घेवून ते धुळे येथील श्री.भाऊसाहेब हिरेे शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित ६७ आणि महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात संशयित म्हणून ३९ रुग्ण दाखल आहेत.

दोघं मध्यम प्रकारातील

जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आहेत. यात मुंगसे येथील एक महिला आणि अमळनेरातील एका पुरुषावर उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण मध्यम प्रकरातील आहेत. या रुग्णालयात सुरुवातील मेहरुणमधील एका कोरोना पॉझिटिव्हला दाखल करण्यात आले होते.

त्याच्या फेरतपासणीमधील दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्यास घरी सोडण्यात आले आहेत.  सालारनगरातील एका कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा आणि त्यानंतर अमळनेरातील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com