नवीन नाशिक : विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी शेकडो उपकरणे जळाली, नगरसेविकेसह नागरिकांचा ठिय्या
स्थानिक बातम्या

नवीन नाशिक : विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी शेकडो उपकरणे जळाली, नगरसेविकेसह नागरिकांचा ठिय्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

अचानक विजेचा दाब वाढल्याने एकाच वेळी नवीन नाशिकमधील घरातील अनेक उपकरणे जळून खाक झाली. उत्तमनगर मधील वृंदावन नगर शिवपुरी चौक भगवती चौक समर्थ चौक परिसरात ही घटना घडली. या घटनेत जवळपास ३०० ते ४०० घरातील फ्रीज, कॉम्प्युटर मिक्सर चार्जर सेट टॉप बॉक्स अशी महागडी उपकरणे जळाली.

घटनेची माहिती महावितरणला माहिती दिली मात्र घटना घडून बराच कालावधी लोटल्याने अद्याप महावितरणच्या एकही अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला.

महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिल्यानंतरदेखील याठिकाणी एकही अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढाला.

मात्र, कार्यालयातही अधिकारी उपस्थित नसल्याने याच ठिकाणी नगरसेविका रत्नमाला राणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध करत भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेत अनेक घरातील फ्रीज, कॉम्प्युटर, मिक्सर, चार्जर, सेट टॉप बॉक्स जळून खाक झाली असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com