मालेगावात आणखी आठ बाधित; सात पोलिसांचा समावेश; आतापर्यंत ६६ पोलिसांना करोनाची लागण

मालेगावात आणखी आठ बाधित; सात पोलिसांचा समावेश; आतापर्यंत ६६ पोलिसांना करोनाची लागण

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात डोळ्यात तेल घालून घालून जगणाऱ्या पोलिसांना लागण झाल्यामुळे चिंतेचे ढग दाटले आहेत. आज सायंकाळी साडेपाच वाजता ४८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४० अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ७ पोलिसांचा समावेश आहे तर इतर एक रुग्ण आढळून आला आहे.

आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ६६ पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफ जवान कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डॉ झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मालेगावातील करोना बाधित रुग्णसंख्या ३३३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात २० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर आतापर्यंत १२ रुग्णांचा दुर्दैवाने करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.

मालेगावमधील रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढून ३७१ वर पोहोचली आहे. आज सकाळी नाशिकमधील एक डॉक्टर आणि मालेगाव येथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. त्यामु

हिम्मत नगर येथील २९ वर्षीय तरुणाला आज करोनाची बाधा झाली आहे. तर नियंत्रण कक्षाचे दोन पोलीस कर्मचारी, ग्रामीण पोलीस मुख्यालयातील ५३ वर्षीय कर्मचारी, आझादनगर व आयशानगर पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. एसआरपीएफ अमरावतील येथील दोघा जवानांना करोनाची लागण झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com