नाशिक शहर पोलीस करणार ड्रोनद्वारे पेट्रोलिंग
स्थानिक बातम्या

नाशिक शहर पोलीस करणार ड्रोनद्वारे पेट्रोलिंग

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस गर्दीवरील देखरेख व नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर करणार आहेत. आज सकाळपासून या संकल्पनेला शहर पोलिसांकडून सुरुवात होईल. पंचवटीतील रामकुंड परिसरातून पहिले ड्रोन उडवून प्रात्याक्षिक करण्यात येणार आहे. याआधी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग नागपूर पोलिसांनी करण्यास सुरुवात केली होती.

हा ड्रोन शहरातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या परिसरात फिरणार आहे. ज्या भाघात गर्दी दिसेल त्या भागात त्या त्या पोलीस ठाण्यांचे पोलीस जाऊन कारवाई करणार आहेत. शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्यासह पोलीस यंत्रणा या ड्रोनचे प्रतिनिधित्व करणार आहे.

संचारबंदी काळात शहरातील बाजारपेठामध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने आता ड्रोन द्वारे शहरात पेट्रोलिंग करण्याचे नाशिक पोलिसांनी ठरवले आहे. विशेष म्हणजे, हा राज्यातील नागपूर पोलीसांनंतर दुसरा प्रयोग आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात संचारबंदी लागू आहे. यात नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. फक्त जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यास मुभा असून त्याच बाजारपेठा सुरू आहेत. मात्र नागरिक यास गांभिर्याने घेत नसून बाजारपेठ मध्ये गर्दी करीत आहेत.

पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण पडत असताना ड्रोनमुळे गर्दीचे परिसर शोधण्यात अधिक सोपे होणार असल्याचे कळते. ड्रोन मार्फत कोणत्या परिसरात गर्दी आहे हे काही सेकंदात समजेल. याद्वारे गर्दी नियंत्रनात ठेवली जाणार आहे. राज्यातील नागपूरनंतर हा दुसरा प्रयोग आहे. याद्वारे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होऊ शकेल अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देशदूतशी बोलताना सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com