Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपाचोरा : मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आरोग्य निरीक्षकांचे मद्यपान

पाचोरा : मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आरोग्य निरीक्षकांचे मद्यपान

आरोग्य निरीक्षका सह दोघांवर गुन्हा दाखल

नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या शासकिय निवासस्थान आवारात बळजबरीने प्रवेश करून  पालिकेचे आरोग्य निरिक्षक सह दोन व्यक्ती मद्यपान करीत असतांना मुख्याधिकारी श्रीमती बाविस्कर यांना आढळून आले. या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी पाचोरा पोलिसात सबधितांवर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना आपत्ती व्यवस्थापन काळात पालिकेच्या प्रशासनातील घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.  आरोग्य निरीक्षकांना य पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोन फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.२२ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास भडगावरोड वरील पालिका मुख्याधिकार्‍यांचे शासकिय निवासस्थानी   आरोग्य निरिक्षक धनराज पाटिल व त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही जणांनी गेट वरील शिपाई यास अरेरावी व दमबाजी करून बळजबरीने शासकिय निवासस्थानात वाहनासह प्रवेश करून निवासस्थानाच्या पोर्चमध्ये खुर्चा टाकुन हे तिन्ही मद्यपान करीत होते.!
मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर निवास्थानी आल्या असता त्यांना आरोग्य निरिक्षक यांच्या सोबतचे एस.टी.सावळे व गौतम निकम या दोघांनी पलायन केले. मुख्याधिकारी निवसस्थानात जात असतांना आरोग्य निरीक्षक हे त्यांच्या मागे  मास्क न लावता शासकिय निवास्थानात संसर्गजन्य आजार पसरविण्याच्या इराद्याने घुसले. व शासकीय आदेशाचा भंग केला म्हणुन तिघांविरुध्द पाचोरा पोलिसात भाग ०५ गुरन १७६/२०२० भादवी कलम ३५४ (ड),४५२,४४८,२७०,२६९,१८८,३४,मुंबई दारूबंदी अधिनियम १९९८ कलम ८५ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य दोन फरार आहेत.
सद्यस्थितीला देशभर कोरोना  संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण देश लाॅकडाउन आहे. शहरातिल आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळणारे आरोग्य निरिक्षक हे त्यांच्यासह दोन जणांना सोबत घेउन मुख्याधिकार्‍यांच्या शासकिय निवासस्थानी मद्यपान करण्याची घटना घडणे म्हणजे नगर पालीका प्रशासनातिल सावळा गोंधळ  सिद्ध करीत आहे.?
- Advertisment -

ताज्या बातम्या