डाॅ. पवार मेडिकल काॅलेज कोव्हिड -19 हाॅस्पिटल घोषित
स्थानिक बातम्या

डाॅ. पवार मेडिकल काॅलेज कोव्हिड -19 हाॅस्पिटल घोषित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मविप्रचे डाॅ.वसंतराव पवार मेडिकल काॅलेज हे कोव्हिड 19 हाॅस्पिटल म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता करोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. सद्यस्थितीत मालेगाव येथे कर्तव्य बजावताना करोना बाधित १८ पोलिसांवर उपचार केले जात आहे. जिल्ह्यातील हे पहिले कोविड – 19 हाॅस्पिटल ठरले आहे.

डाॅ.पवार मेडिकल काॅलेजमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिली करोना टेस्टिंग लॅब कार्यन्वित झाली आहे. 29 एप्रिलला करोना टेस्टिंग लॅब सुरू झाल्यापासून आज पर्यंत एकूण 1394 नमुन्यापैकी 1250 इतके स्वॅब डाॅक्टरांच्या टिमने कोणत्याही प्रकारचे आॅटोमॅटिक मशिन नसताना तपासले.

सरचिटणीस निलिमाताई पवार यांनी लॅब सुरु करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले व 15 दिवसात सरकारी अधिकारी वर्गाच्या मदतीने लॅब सुरू केली. आता यापुढेही एक पाऊल पुढे टाकत डाॅ. पवार मेडिकल काॅलेज फक्त करोना पाॅझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी ऊपलब्ध करून दिले आहे.

जिल्हातील व उ.महाराष्ट्रातील हे पहिले कोविड 19 हाॅस्पिटल ठरले आहे. या ठिकाणी करोना रुग्णांवर उपचारासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या अाहेत. या ठिकाणी १९ करोना पाॅझिटिव्ह पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com