Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकखबरदार! कोरोनाच्या नावे एप्रिल फुल कराल तर…; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी

खबरदार! कोरोनाच्या नावे एप्रिल फुल कराल तर…; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी

नाशिक | प्रतिनिधी 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात संचारबंदी लागू आहे. मात्र, नागरिक जीवनावश्यक वस्तूंची, ने-आण करणे, मेडिकलचे कारण सांगत शहरात हिंडताना दिसून आले होते. या रिकामटेकड्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता एप्रिल महिन्यात करण्यात येणाऱ्या एप्रिल फुलवरदेखील प्रशासनाचे लक्ष लागले आहे. कोरोना विषाणूवर जर कुणी एप्रिल फुल केले तर दुसऱ्या दिवशी त्याची थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. याबाबतच्या कडक कारवाईबात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.

- Advertisement -

उद्या 1 एप्रिल असून एप्रिल फुलच्या निमित्ताने सर्वत्र खोट्या अफवा पसरवल्या जातात. यात फेसबुक आणि व्हाट्सअप चा मोठा सहभाग असतो. मात्र, सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सर्वत्र संचारबंदी सुरु असून नागरिक घरातच बसून आहेत.

अशा परिस्थितीत जर कुणी या विषानुबाबत अनेक अफवा पसरवून नागरिकांना वेठीस धरले तर अशांवर कारवाई होणार आहे. तसेच अशा अफवा पसरविण्यात भागीदार होऊ नका…अफवा पसरत असेल तर तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

सोशल मीडियावर एप्रिल फुल म्हणून कोणी कोरोना बाबत अफवा पसरवली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांचा 2 एप्रिल मात्र वाईट जाईल असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या