नाशिक जिल्हयातील ३२ पोलिसांना महासंचालक पदक; उपअधिक्षक साळवे, निरिक्षक वाघ यांचा समावेश

नाशिक जिल्हयातील ३२ पोलिसांना महासंचालक पदक; उपअधिक्षक साळवे, निरिक्षक वाघ यांचा समावेश

नाशिक । दि. ३० प्रतिनिधी

महाराष्ट्रदिनानिमित्त पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचे पोलिस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील 31 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील मनमाडचे उपअधीक्षक समीर साळवे व नाशिक शहर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांचा सामावेश आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील 800 पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचे पोलिस महासंचालक पदके जाहीर केली आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील 16, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील नऊ, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र पोलीस अकादमीतील तीन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एक, दहशतवाद विरोधी पथकातील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक ग्रामीण मनमानडचे उपअधीक्षक समीर साळवे यांना नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी तर, नाशिक शहर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना गुन्ह्यांची उत्कृष्टपणे उकल केल्याबद्दल पदक जाहीर झाले. तर, उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस सेवा काळात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

पोलिस महासंचालक पदक जाहीर झालेले अधिकारी, कर्मचारी

उपअधीक्षक समीर साळवे ( नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी), उपअधीक्षक दिनकर पिंगळे (लाचलुचपत प्रतिबंधक, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ (गुन्हे-उकल), नाशिक), पोलिस निरीक्षक प्रभाकर घाडगे (उत्तम सेवा), उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक नितीन चंद्रात्रे, अनिल भालेराव, भागीरथ हांडोरे, हवालदार विनोद पाटील, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, पोलिस नाईक मनिष धनवटे (डीटीएस नाशिक), शेख अलिम शेख सलीम, पोलिस नाईक देवराम सुरंगे, साधना खैरनार (नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक), भारत पाटील. उपअधीक्षक समीरसिंग द्वारकोजीराव साळवे (नक्षलविरोधी कारवाई), सहाय्यक उपनिरीक्षक सुनील आहिरे (उत्तम सेवा), जावेद इब्राहिम देशमुख, भाऊसाहेब ठाकरे, हवालदार दिलीप देशमुख, शांताराम नाठे, अण्णासाहेब रेवगडे, पोलिस नाईक तुषार पाटील, भारत कांदळकर.  राजेंद्र ठाकरे, हवालदार दिनेश सूर्यवंशी, सचिन अहिरराव. (महाराष्ट्र पोलिस अकादमी), महादेव वाघमोडे , हवालदार रफिक पठाण, पोलिस नाईक अनिल घुले. (दहशतवाद विरोधी-पथक

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com