दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी : तालुक्यात वेगवेगळ्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

तळेगाव दिंडोरी येथील श्रीकांत राजेंद्र सांळूखे (वय २५) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सांळूखे यंच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. श्रीकांत सांळूखे याच्या पश्‍चात आई, वडील, आजी, बहिणी असा परिवार आहे.

तर दुसऱ्या घटनेत लखमापूर येथील सुमित पंडीत सोनवणे (वय १४) याचा पाण्याच्या ट्रॅकरमधुन विद्यूत मोटारीने पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून जखमी झाला. त्याला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणला असता त्यास मृत घोषित करण्यात आले. या दोन्ही घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता ठेवण्यात आले होते.

Deshdoot
www.deshdoot.com