चिंचखेड : बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेफर्ड श्वानाचा फडशा
स्थानिक बातम्या

चिंचखेड : बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेफर्ड श्वानाचा फडशा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

चिंचखेड | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे  बिबट्याच्या दहशतीने स्थानिक दहशतीखाली आहेत. येथील महादेव वाडी परिसरात राहुल शेळके यांच्या घराजवळील जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली.

पहाटेच्या सुमारास त्याने शेळके यांच्या घराजवळील कुत्र्यावर हल्ला केला. हल्ल्यात कुत्र्याला शेतात पकडून घेऊन जात बिबट्याने त्याचा कोथळा बाहेर काढला.

आज सकाळी शेळके यांच्या ही घटना निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रकार वन विभागाला सांगण्यात आला. या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून बिबट्याच्या भीतीने येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. या परिसरात शेतमजूर देखील कामाला येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ होत आहे.

याच परिसरात पाच महिन्यांपूर्वी देखील बिबट्याचा वावर होता. परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर या पिंजरामध्ये बिबट्या जेरबंद झाला होता.

त्यानंतर पुन्हा बिबट्या नजरेस पडल्याने परिसर दहशतीखाली आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी महादेव वाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com