Friday, April 26, 2024
Homeधुळेसापाला घाबरून पळतांना विहिरीत पडून दोघा भावांचा मृत्यू

सापाला घाबरून पळतांना विहिरीत पडून दोघा भावांचा मृत्यू

धुळे तालुक्यातील चांदेपाडा येथील घटना

धुळे – 

रस्त्याने जातांना सर्प दिसल्याने त्याला घाबरून सैरभैर पळतांना दोघा चुलत भावांचा शेत विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील चांदेपाडा येथे काल सायंकाळी घडली. याबाबत धुळे तालुका पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

चेतन संतोष राठोड (वय 14), करण पुनमचंद राठोड (वय 16 रा. चांदेपाडा ता. धुळे) असे दोघा मयतांची नावे आहेत. दोघांसह गावातील आकाश ईश्वर राठोड व एक मुलगा चौघे काल दि. 14 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. त्यादरम्यान त्यांना अचानक सर्प दिसला.

त्यामुळे चौघे घाबल्याने सैरभैर पळाले. त्यात चेतन व करल हे दोघे गावातील गंभीर भालेराव पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडले. याबाबत कळल्यानंतर ग्रामस्थांसह कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा करण हा पाण्यावर तरंगताना दिसून आला.

चेतन दिसत नव्हता. करणला ग्रामस्थांनी दोराला खाट बांधुन विहिरीतुन वर काढले. तर चेतनला शोधण्यासाठी गावातील पट्टीच्या पोहणार्‍या मुलांना विहीरीत उतरवुन त्यांचे मदतीने त्याला पाण्यातुन बाहेर काढले. दोघांना जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता डॉ. सुरज यादव यांनी तपासणी करून मयत घोषित केले.

याबाबत मधुकर ममराज राठोड (वय 35, रा. चांदेतांडा) यांच्या माहितीवरून धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या