स्थानिक बातम्या

धुळे : विलगीकरण कक्षातून ७ जण फरार

Balvant Gaikwad

शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षातून आज भल्या पहाटे 7 रूग्णांनी पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.

क्वारंटाईन केले हे सात जण काही दिवसांपुर्वीच कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कात आले होते. गेल्या रविवारी त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. परंतू या सात जणांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास कक्षातून पलायन केले.

या सात जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या सातही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही.

विलगीकरण कक्षातील सात संशयीत रूग्ण आढळून येत नसल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली आहे. पंरतू याबाबत शहर पोलिसात उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Deshdoot
www.deshdoot.com