झोतवाडे येथील तरुण शेतकर्‍याची विषप्राशनाने आत्महत्या

झोतवाडे येथील तरुण शेतकर्‍याची विषप्राशनाने आत्महत्या

शिंदखेडा  – 

झोतवाडे ता. शिंदखेडा येथे तरूण शेतकर्‍याने विषारी औषध घेवून आत्महत्या केली. नितीन (जिजाबराव) आनंदा सदाराव  (वय 35) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला त्यात सरकारने तुटपुंजी मदत केली. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे पेड करायचे व परिवाराचे उदरनिर्वाह कसे करायचे यामुळे त्याला नैराश्य आले होते.

या वर्षी देखील अतीवृष्टीमुळे शेतातील कापुससहीत सर्व पिकांचे झालेले नुकसान पाहुन या वर्षीही सहा एकर जमीन मध्ये दोन भावांच्या परीवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचे घेतलेले तीन लाखाचे कर्ज व खाजगी कर्ज कसे फेडावे या विवेचंनात असतांना  मुलांचे शिक्षण कसे करणार याला कंटाळून त्याने फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केली.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व माजी पं.स.सदस्य शानाभाऊ सोनवणे यांना शेतकर्‍याच्या आत्महत्या  केल्याचे समजताच त्यांनी झोतवाडे गावाकडे धाव घेतली व नितिन (जिजाबराव) आनंदा सदाराव याला उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे दाखल केले.

तेथुन नितिन सदाराव याला जिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले व धुळे जिल्हा रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.शानाभाऊ सोनवणे यांनी मयताच्या परिवाराचे सांत्वन केले.

नितिन सदाराव याच्या पश्चात दोन मुली, मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजाई,बहिण असा परीवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com