मालेगावकरांची चोरट्या मार्गाने धुळ्यात घूसखोरी
स्थानिक बातम्या

मालेगावकरांची चोरट्या मार्गाने धुळ्यात घूसखोरी

Balvant Gaikwad

मालेगावमध्ये कोरोना बाधितांची आढळून आलेली संख्या आणि संशयितांचा वाढता आकडा विचारात घेता चोरट्या मार्गाने तसेच मध्यरात्री काही जण दुचाकीने धुळ्यात प्रवेश करीत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क व्हावे अशी मागणी होते आहे.

कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन, जिल्हा बंदी करण्यात आली आहे. चार दिवसांपुर्वी धुळ्यात कोरोनाचे दोन संशयित आढळून आले, दोघांचाही मृत्यू झाला पैकी एक तरुणी मालेगावमधील रहिवासी होती. याच दरम्यान मालेगावात 30 पेक्षा अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून संशयितांचा आकडा देखील मोठा आहे.

त्यामुळे मालेगावातील रुग्ण धुळ्यात दाखल करुन घेण्यात आरोग्य यंत्रणेने असर्थता दर्शविली आहे. मात्र मालेगावातील वाढता धोका विचारात घेवून तेथील काही नागरिक मध्यरात्री चोरट्या मार्गाने धुळ्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांना वेळीच मज्जाव घालावा, पोलीस बंदोबस्त वाढवावा अशीही मागणी धुळेकरांकडून होते आहे.

नवीन पॉझिटीव्ह नाही, अ‍ॅडमिट 71

साक्री आणि मालेगावातील पॉझिटीव्ह वगळता धुळे जिल्ह्यात नवीन एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. प्रशासन व आरोग्य यंत्रणा याबाबत पुर्णपणे सतर्कता बागळत असून आवश्यक त्या तातडीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र संशयित असलेले 71 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com