मुकटी गावाजवळ गॅस टँकर-लक्झरीची धडक ; भीषण स्फोट, 2 जण ठार
स्थानिक बातम्या

मुकटी गावाजवळ गॅस टँकर-लक्झरीची धडक ; भीषण स्फोट, 2 जण ठार

Balvant Gaikwad

भीषण स्फोटामुळे 2 किलोमीटर परिसरात सामसूम ; दोन्ही वाहने आगीत खाक 

सुरत- नागपूर महामार्गावरील मुकटी जवळील कासविहिर गावालगत लक्झरी बस आणि गॅस ट्रँकरची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनातील दोन जण आगीत जाळून खाक झालेत.

दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेतील वाहनांच्या धडकेनंतर भीषण स्फोट झाला. वळण रस्ता असल्याने लक्झरीने गॅस ट्रँकरला समोरून धडक दिल्याचे सांगितले जाते.

प्रवाशी सोडून लक्झरी परत येत होती. अपघातानंतर परिसरातील दोन किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज झाला. नागरिक भयभीत झालेत, आगीने क्षणार्धात रौद्र रूप घेतले.

ग्रामस्थ, पदाधिकारी ,कार्यकर्ते, यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र भीषण आगीमुळे त्यांना जवळ जाता आले नाही.

Deshdoot
www.deshdoot.com